कोल्हापूर-=-= - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात
कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात बंदीस्त असलेले सनातनचे साधक श्री. समीर
गायकवाड यांना प्रतिदिन दुपारी १२ ते ३ या वेळेत कारागृहाच्या आवारात
फिरण्यास न्यायालयाने अनुमती दिलेली आहे. असे असतांना न्यायालयाचा आदेश
डावलून कारागृह प्रशासनाकडून गेल्या आठवड्यापासून श्री. समीर यांना बाहेर
फिरण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन
यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर न्यायाधिशांनी या संदर्भात
कारागृह प्रशासनास नोटीस बजावण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा न्यायाधीश
एल्.डी. बिले यांच्यासमोर ही सुनावणी चालू आहे. अधिवक्ता आनंद देशपांडे
हेही अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांच्यासमवेत उपस्थित होते.
कॉ. पानसरे यांच्या खटल्याच्या संदर्भात शैलेंद्र दिगंबर मोरे आणि संजय अरुण साडवीलकर, अशा आणखी दोन साक्षीदारांचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर जबाब घेण्यात आला आहे. या जबाबाच्या प्रती पुढील वेळेस उपलब्ध करून देण्यात येतील, असे शासकीय अधिवक्त्यांनी न्यायालयात सांगितले. सरकार पक्षाच्या वतीने शासकीय अधिवक्ता चंद्रकांत बुधले यांनी न्यायालयात बाजू मांडली. श्री. समीर गायकवाड यांना पोलीस बंदोबस्तात न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान आरोप निश्चिती करण्यास उच्च न्यायालयातून स्थगिती असल्याने कोल्हापूर येथील पुढील सुनावणी १२ ऑगस्टला होईल, असे न्यायाधिशांनी घोषित केले.

Post a Comment