पुणे- -
पंढरपूर येथे नुकतेच एका ब्राह्मण महिलेवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. या घटनेत ४५ वर्षीय महिलेवर वासनांधांनी घरात घुसून तिच्या नवर्यासमोर बलात्कार केला. या प्रकरणी नराधमांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवून महिलेला न्याय मिळवून द्यावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २६ जुलै या दिवशी अलका चित्रपटगृह चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींनाही तात्काळ अटक करावी, तसेच महिला अत्याचाराच्या संदर्भात कठोर शिक्षेचे प्रावधान करावे, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. या प्रसंगी महासंघाचे सर्वश्री विश्वजित देशपांडे, अविनाश कुलकर्णी, पराग आपटे, आनंद दवे, ज्येष्ठ लेखक रविकिरण साने, ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या पुणे केंद्राचे प्रमुख प्रकाश दाते, रणरागिणी शाखेच्या कु. मोनिका गावडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगवणे हेही उपस्थित होते.

Post a Comment