टेंभुर्णी,--- -
येथील औद्योगिक वसाहतीतील जिंदाल स्टील कंपनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावल्याच्या कारणावरून १२० कामगारांना कामावरून काढण्यात आले आहे. त्यामुळे कामागारांनी आस्थापनाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. टेंभुर्णी पोलिसांनी कारखान्याच्या प्रवेशदारासमोर बंदोबस्त ठेवला आहे.
जिंदाल स्टील कंपनीमध्ये अनेक परप्रांतीय कामगार कामाला असून त्यांपैकी १२० कामगार स्थानिक आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र लावून त्याची पूजा केली. त्यामुळे कारखान्याचे अधिकारी आणि कामगार यांच्यात वाद झाला. त्यानंतर पर्यवेक्षक (सुपरवायझर) जाधव यांनी संबंधित कामगारांना सांगितले, कारखान्यामध्ये काम नसल्याने तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नये. तसेच त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रारही केली.
या प्रकरणी शिवसेनेचे टेंभुर्णी शहरप्रमुख सुरेश लोंढे यांनी सांगितले की, येत्या २ दिवसांत स्थानिक कामगारांना कामावर घ्यावे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र पुन्हा लावून कामगारांची क्षमा मागावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. कंपनीचे मुख्य व्यवस्थापक मिश्रा यांनी सांगितले, जिंदाल कंपनीमध्ये काम न्यून झाल्याने काही दिवसांसाठी कामगारांना न येण्यास सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रावरून कंपनीमध्ये काही घडले नाही.

Post a Comment