चांदूर रेल्वे- (शहेजाद खान)-/----------
शहरात अनेक सार्वजनिक मोठ्या विहिरी असुन या विहिरींना भरपुर प्रमाणात पाणीसुध्दा आहे. मात्र शहरात सार्वजनिक विहिरी बुजविण्याची प्रथा काही थांबलेली दिसत नाही आहे. एक नंतर आता दुसरी ही सार्वजनिक विहिर मुख्याधिकाऱ्यानी यांच्या आदेशावरून नुकतीच बुजविली असुन सार्वजनिक विहिर बुजविल्यास नेहमीच लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे व शहरातील बुजविलेली विहिर उपसण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शहरातील उर्दु शाळेजवळील सार्वजनिक विहिर ३ वर्षांपुर्वी एका शहरवासीयाने स्वत:च्या फायद्यासाठी बुजविली होती. या विहिरीची तक्रार करून सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ यांनी सतत २ वर्ष लढा दिला. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जवंजाळ यांच्या बाजुने निकाल देत विहिरी उसण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यांना यश मिळाले होते. ती विहीर पुर्णपणे उपसुन बांधण्यातही आली. आज त्या विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी असुन पाण्याचा उपयोग त्या भागातील नागरीक करतात. व आजही ती विहीर गौतम जवंजाळ यांच्याच नावाने ओळखल्या जाते. या विहीरीनंतर आता जवंजाळ यांची दुसऱ्या विहिरीसाठी लढाई सुरू झाली आहे. स्थानिक नगर परिषद समोर पशु वैद्यकिय दवाखाना आहे. या दवाखान्याजवळ नवीन दुमजली व्यापारी संकुलाचे काम सुरू असुन ते काम पुर्णत्वास आले आहे. या जागेवर मुबलक पाणी असणारी नगर परिषदेच्या मालकी विहीर होती. या विहीरीला भर उन्हाळ्यात मुबलक पाणी राहते. या जागेवर व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरू असतांना सदर जागेतील सार्वजनिक विहीर बुजवु नये व या विहिरीच्या पाण्याचा उपयोग संकुलातील दुकानदारांना व्हावा असे निवेदन मागीलवर्षी तत्कालीन नगरपालीका मुख्याधिकारी मंगेश खवले तसेच उपविभागीय अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते श्री गौतम जवंजाळ व उत्तमराव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर एसडीओ यांनी दिलेल्या सुचनेवरून तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश खवले यांनी सदर विहिरीची डागडुगी करून त्यावर जाळी बसविली होती. परंतु आता नगर परिषदेत नवीन आलेल्या मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी नियम ढाब्यावर बसवुन सदर विहीर बुजविण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशावरून संबधीत कंत्राटदाराने विहीर बुजविली आहे. सदर विहीरीचा नवीन व्यापारी संकुलाचे बांधकामात कोणताही अडथळा होत नव्हता. उलट नवीन व्यापारी संकुलातील दुकानदार व नागरिकांना या विहीरीच्या पाण्याचा उपयोगच होता. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून बुजविलेली विहीर पुन्हा उपसण्यात यावी व विहिरीच्या पाण्याचा उपयोग व्यापारी संकुलासाठी करावा अशी मागणी श्री गौतम जवंजाळ व उत्तमराव ठाकरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. मात्र यंदा विहीरीची लढाई थेट मुख्याधिकाऱ्यां विरोधातच असल्यामुळे प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Post a Comment