BREAKING NEWS

Thursday, July 21, 2016

गोवंश ची तस्करी करणाऱ्या ट्रक ड्रायवर ने केलेल्या कृत्याचा -हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदने सादर - कठोर कारवाइची मागणी


अमरावती /-सुरज देवहाते /----- 



 
काल सायंकाळ चा सुमारास अवैधरीत्या गोवंश  नेणाऱ्या ट्रकने चारचाकी वाहनास चिरड्यलायाने चांदूर बाजार मधील काकडे पुरा येथील रहिवासी श्री किशोर इंगळे(40) शिल्पा इंगळे (३८) याची पत्नी. व मुलगा शोर्य इंगळे (6) यांचा जागीच मृत्यू  झाला होता त्यात एक गंभीर अमरावती येथील रुग्णालयात उपचार घेत आहे  सदर ट्रक ने  अनेक वाहनांना धडक देत तब्बल 25 जणांना जखमी केले  सदर घटना चांदूर बाजार ते अमरावती वलगाव मार्गावरील खरवाडी या गावाजवळ घडली. याच घटनेचे पडसाद आता संपूर्ण जिल्यात उमटायला सुरवात झाली आहे  अमरावती मध्ये हि काही हिंदुत्ववादी संघटनांकडून या अमानुष कृत्याचा निषेध करण्यात आला आहे या संदर्भात आज अमरावती चे जिल्हाधिकारी व अमरावती चे पोलीस आयुक्त यांना निवेदने देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली  आहे.  त्यात प्रामुख्याने काही मागण्या हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आल्या आहेत त्यात  त्यांनी असे म्हटले आहे कि सदर खटला fast track कोर्टात चालवण्यात यावा , ज्या ड्रायवर चा हातून हा गुन्हा झाला आहे त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी कारण हा अपघात नसून आवर्जून केलेला गुन्हा आहे , सदर प्रकरणामध्ये दिरंगाई केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर व पेट्रोलिंग व चेक पोस्ट वर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी , ट्रक चा मालकाला सुधा लवकरात लवकर अटक करावी गंभीर जखमी असणारे चा खर्च शाशनाने करावा, गोवंश वाहून नेणारे वाहन जे पोलिसांतर्फे पकडण्यात येतात त्या प्रत्येक वाहनाचा नोंदणी क्रमांक तत्काळ  विहित करावा  , ड्रायवर चा वाहन चालवण्याचा परवाना सुद्धा विहित करावा ,
निवेदन देते वेळी सर्व  श्री बादल कुलकर्णी , सुधीर बोपुलवार, निलेश टवलारे, विनोद शर्मा , गणेश खोत , अखिलेश राजपूत ,चेतन जैन , पंकज चौधरी , रोहन गणेडीवाल ,आकाश ठाकरे , निखील भटकर , रोहित काळे , आकाश वाघमारे , सौरभ गावंडे , प्रणीत सोनी आदी हिंदुत्ववादी  संघटनांनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सदर निवेदनाचा प्रतिलिपी या माननीय मुख्यमंत्री श्री फडणवीस , माननीय श्री रणजीत पाटील (गृहराज्यमंत्री -शहर)  माननीय श्री दीपक केसरकर (गृहराज्यमंत्री -ग्रामीण) व अमरावतीचे पालकमंत्री श्री प्रवीण पोटे  यांना हि पाठवण्यात आलेल्या आहेत

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.