मुंबई -
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. धनंजय देसाई पुरावे नसतांनाही कारागृहात आहेत, तसेच सनातन संस्थेवर बंदीची अन्याय्य मागणी होत आहे, या विरोधात मुंबईतील समस्त राष्ट्र्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आल्या आहेत. २८ जुलै या दिवशी मुंबईतील आझाद मैदानात दुपारी २ वाजता भव्य निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी धर्माभिमानी हिंदूंनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्र्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी २६ जुलै या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भारतीय युवा शक्तीचे मुख्य सल्लागार अधिवक्ता अंश देसाई, हिंदु राष्ट्र सेनेचे प्रवक्ता श्री. आदित्य देशमुख आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. विशाल पटनी उपस्थित होते.
या आंदोलनात हिंदु महासभा, हिंदु राष्ट्र सेना, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भारतीय युवा शक्ती, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, वीर जिजामाता प्रतिष्ठान, अजिंक्य मावळा प्रतिष्ठान, रायगड संवर्धन समिती, महाराणा प्रताप बटालियन, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, हिंदु गोवंश रक्षा समिती, मातृभूमी प्रतिष्ठान, बजरंग दल, ब्लड हेल्प हिंदुस्थान, राष्ट्रीय नवयुवक लोकसेवा संघ, दुर्गवीर प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य अनेक समविचारी संघटना सहभागी होणार आहेत.

Post a Comment