BREAKING NEWS

Sunday, July 24, 2016

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जमीन अधिग्रहण लवकरच

Nagpur News :--



विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोंकण विभाग जोडणाऱया ‘नागपूर-रत्नागिरी’ राष्ट्रीय महामार्गासाठी ८ हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असुन त्यासाठी राज्यशासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रिया युध्द पातळीवर सुरु करावी, अशा सूचना केंद्रीय भुपृष्ठ वाहतून कमंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे. हा महामार्ग रत्नागिरी येथून सुरु होऊन कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, औसा, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा या जिह्यांतून नागपूर येथे संपणार आहे.
नागपूर-रत्नागिरी या महामार्गाअंतर्गत नागपूर-बुटीबोरी (२८.८किमी.) बुटोबोरी-वर्धा (५९.१९किमी.) वर्धा-यवतमाळ (६४.९२ किमी) यवतमाळ-महागाव (८०.१९किमी.) महागाव-वारंगा (६६.८८किमी.) वारंगा-लोहा (६७.५६किमी.) लोहा-चाकुर (६२.२०किमी.) चाकुर-औसा (५८.७६किमी.) औसा-तुळजापूर (६७.४२किमी.) तुळजापूर-सोलापूर (४६.००किमी.) सोलापूर-सांगली  (१९५.१५किमी.) सांगली-कोल्हापूर (७६.१०किमी.) कोल्हापूर-रत्नागिरी (१३७.२८किमी.) असे एकूण १ हजार ९ किलोमीटर लांबीच रस्ता तयार होणार आहेत.
नागपूर-रत्नागिरी या महामार्गाअंतर्गत राज्य शासनाला २ हजार ४०० हेक्टर जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. या अधिग्रहणासाठी लागणारा निधी केंद्र शासन देण्यास तयार आहे. राज्य शासनाने जमीन अधिग्रहण प्रक्रीया व वन विभागाशी संबंधीत विषयांबाबत तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरुन या महामार्गाच्या बांधकामासाठी केंद्र शासन आवश्यक निधी उपलब्ध करुन देईल, असे ही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.