नवी देहली - देशात समान नागरी
कायदा लागू करण्यासाठी केंद्रशासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन कायदा मंत्री
रविशंकर प्रसाद यांनी राज्यसभेत केले. विश्वंभर प्रसाद यांनी उपस्थित
केलेल्या प्रश्नाला प्रसाद यांनी लिखित स्वरूपात उत्तर दिले.
राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी म्हटले की, समान नागरी कायदा हा
महत्त्वाचा कायदा आहे. त्यामुळे यासंदर्भातील सर्व गोष्टी व्यवस्थित तपासणे
आणि सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्यामुळे हा कायदा विधी आयोगाकडे
शिफारशींसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेच्या नीती मार्गदर्शक तत्त्वाच्या कलम
४४ नुसार समान नागरी कायदा लागू करणे सरकारचे कर्तव्य आहे.
Post a Comment