BREAKING NEWS

Wednesday, July 27, 2016

अफजलखानवधाचे चित्र वगळणे हे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सत्य इतिहास दडपण्याचे षड्यंत्र ! - सुनील घनवट

  पुणे -






बालभारतीने म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती परिसर अभ्यास (भाग २) या पुस्तकात अफजलखान वधाच्या चित्राच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाची गळाभेट घेण्यास जात असल्याच्या संदर्भातील दिशाभूल करणारे चित्र प्रकाशित केले आहे. गनिमी काव्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून छत्रपती शिवरायांनी पराक्रमाचा इतिहास घडवला; पण शालेय अभ्यासक्रमात अफजलखानवधाचे चित्र वगळण्यात आले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सत्य इतिहास दडपण्याचेच हे षड्यंत्र आहे. येत्या ७ दिवसांत अभ्यासक्रम पालटून अफजलखानवधाचे चित्र आणि संबंधित इतिहास पाठ्यपुस्तकात अंतर्भूत करावे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करून पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बरखास्त करावे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता श्री. सुनील घनवट यांच्यासह उपस्थित इतिहासप्रेमी आणि शिवप्रेमी आंदोलक यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २५ जुलै या दिवशी येथील बालभारतीच्या कार्यालयात शिक्षण सहसंचालक सुनील चव्हाण आणि इतिहास, नागरिकशास्त्र विषयांचे विशेष अधिकारी मोगल जाधव यांना निवेदन देण्यात आले. इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात अफजलखान भेटीचे चित्र समाविष्ट करणार्‍यांचा अफजलखान वधाचे छायाचित्र भेट देऊन निषेध करण्यात आला. हे निवेदन स्वीकारून त्वरित त्याचा अहवाल पुढे पाठवण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिले.

     या प्रसंगी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज आणि वडकी येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेचे संचालक श्री. पंडित मोडक, हिंदु एकता आंदोलन पक्षाचे अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे, अधिवक्ता चंद्रकांत भोसले, शिवसेनेच्या खडकवासला मतदार संघाच्या महिला आघाडी अध्यक्ष सौ. सुनीता खंडाळकर आणि सौ. शोभा शहा, गार्गी फाऊंडेशनचे श्री. विजय गावडे, होय हिंदुच गटाचे श्री. देवेंद्र जांगळे, अक्षय फळणे, शिवसेनेचे श्री. अमितराजे गुरव, धर्माभिमानी श्री. नीलेश पवार, तेजस काळे, ह.भ.प. गुलाब मोडक, राजस्थान येथील प्रदेश काँग्रेस समितीचे अधिवक्ता बालकीसन गोठवाल यांच्यासह ३० हून अधिक इतिहासप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.