मुंबई -
बालभारतीने म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता ४ थीच्या शिवछत्रपती (परिसर अभ्यास - भाग २) या पुस्तकात अफझलखान वधाच्या चित्राच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाला आलिंगन देण्यास जात आहेत, असे दिशाभूल करणारे चित्र प्रकाशित केले आहे. हे वादग्रस्त चित्र पालटून पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाच्या म्हणजेच अफजलखान वधाच्या चित्राचा समावेश करावा. येत्या ७ दिवसांत याविषयी काही कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी, रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सावंत, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई समन्वयक श्री. बळवंतराव दळवी, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले आदी उपस्थित होते.

Post a Comment