काहीही पुरावे नसतांना हिंदु संत आणि हिंदुत्ववादी यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. आतंकवादविरोधी पथकाचे (एटीएस्चे) अधिकारी कारागृहात दबावतंत्राचा वापर करून ही कृत्ये करत आहेत. अधिकार्यांनी केलेल्या अन्यायाची माहिती जनतेला होण्यासाठी आंदोलने, पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू जनतेसमोर मांडली पाहिजे. संत आणि हिंदुत्ववादी नेत्यांवर होणार्या अन्याय्य घटनांविषयी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे.
कॉ. पानसरे हत्येप्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड गेल्या ९ मासांपासून अटकेत आहेत; मात्र आरोपपत्र दाखल केलेले असतांना खटला स्थगित करून प्रकरण जाणीवपूर्वक लांबवले जात आहे. विशेष अन्वेषण पथकाचे (एस्आयटीचे) प्रमुख संजयकुमार हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळ्याविषयी काहीच माहिती देत नाहीत. घोटाळ्याविषयी आम्ही त्यांना सर्व पुरावे दिले आहेत. तसेच डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्येप्रकरणी तथाकथित पुरोगाम्यांच्या मागणीवरून सनातनवर बंदीचे षड्यंत्र आखले जात आहे. या हिंदुविरोधी षड्यंत्राला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
Post a Comment