पुणे, -- विद्यार्थ्यांनी सैराट चित्रपटाचा आदर्श न घेता हात
गमवूनही पायाने पेपर लिहून उत्तीर्ण झालेल्या आणि परीक्षेच्या काळात
रक्ताच्या कर्करोगाशी लढत असतांनाही ८१ टक्के गुण मिळवणार्या २
विद्यार्थ्यांचा आदर्श घ्यायला हवा. विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी सैराट
व्हायला हवे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांनी केले. राष्ट्र्रवादी
काँग्रेस पक्षाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार अनिल
भोसले यांनी आयोजित केलेल्या कर्तृत्व प्रेरणा पुरस्कार सोहळ्याच्या वेळी
ते बोलत होते.
Post a Comment