नगर, - कोपर्डीसारख्या घटना रोखण्यासाठी सीरिया देशात जसे कडक
कायदे आहेत, तसे कायदे आपल्याकडे करण्याची आवश्यकता आहे. पीडितांना शस्त्र
अनुज्ञप्ती (परवाने) दिल्यामुळे प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी राज्यात
कायद्याचा धाक असला पाहिजे. निष्पाप आणि चिमुरड्या मुलींवर होणारे अत्याचार
रोखण्यासाठी राज्यात शरीयासारखे कडक कायदे करायला हवेत, असे प्रतिपादन
महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख श्री. राज ठाकरे यांनी केले.राज ठाकरे यांनी २५ जुलै या दिवशी कोपर्डी गावामध्ये जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर ते बोलत होते.
Post a Comment