BREAKING NEWS

Monday, July 25, 2016

चांदूर रेल्वेच्या सेंट्रल बँकेत सेवानिवृतांना हेलपाटे - निवृत्ती वेतन जमा करण्यासाठी लागतो पंधरवाड


चांदूर रेल्वे / शहेजाद खान /---



येथील सेंट्रल बँकेत अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याना  मासीक सेवा निवृत्ती वेतन मिळते. मात्र त्यांना शासनाने दिलेले मासीक निवृत्ती वेतन जमा करण्यास स्थानिक बँक फार विलंब करीत असल्याने वयोवृध्दांना निवृत्ती वेतन घेण्यासाठी सारखे हेलपाटे मारावे लागत आहे.
चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेत अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे  मासिक निवृत्ती वेतन जमा होते.मात्र त्यांचे निवृत्ती वेतन जमा करण्यास सेंट्रल बँक नेहमीच टाळाटाळ करते. त्यामुळे महिण्याच्या पहिल्या आठवड्यात आलेले वेतन तब्बल पंधरा दिवसांनी जमा केल्या जाते. त्यामुळे वयोवृध्दांना निवृत्ती वेतन घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागते. याबद्दल सेवानिवृत्तानी अनेकदा खंत व्यक्त केल्यानंतरही त्याचा त्रास कमी झालेला नाही. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता ’ स्टॉप कम है ’ असे उत्तरे देवुन मोकळे होतात. सेवानिवृत्तासह बँकेत येणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा मिळावी व सेवानिवृत्तांचा निवृत्त वेतन वेळेवर जमा करावे अशी मागणी सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेने शाखा व्यवस्थापक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतुन केली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.