चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--
-
अमरावती वन विभाग चांदूर रेल्वे परिक्षेत्र अंतर्गत वन्यप्राणी शिकार प्रतिबंधक कामी तैनात गस्ती पथकाने चांदूर रेल्वे परिक्षेत्रातील आठवडी बाजार व जंगलावर कडक बंदोबस्त ठेवला असुन कुऱ्हा बाजारात सशांची विक्री करणाऱ्या शिकारींना पकडुन सात सशांना जिवदान दिले.
वन्य प्राणी निसर्ग प्रेमी यांच्या वतीने अमरावती वन विभाग चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रात वन विभाग गस्ती पथकाच्या साह्याने वन्य प्राणी शिकारीला आळा घालण्यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला. वनपरिक्षेत्रातील मालखेड रेल्वे, कुऱ्हा , मार्डी, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे या बाजारात तसेच देवगाव फाटा हायवेवर गस्ती पथक तैनात करून होणाऱ्या शिकारीवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या गस्ती पथकाने कुऱ्हा बाजारात शिकार्यांवर कारवाई करून विक्रीला आनलेल्या ७ सशांना जिवदान दिले.
Post a Comment