(बुलडाणा) :-
बुलडाणा जिल्यातील मेहकर तालुकातील घाटनांद्रा येथील अकरावीत प्रवेश न मिळाल्याने विहिरीत उडी मारुन विद्यार्थीनीने केली आत्महत्या कु. जया विजय राठोड असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. हि मागील दोन वर्षापासुन खामगाव येथील जे.व्ही.मेहता नवयुग विद्यालय येथे शिक्षण घेत होती व येथून दहावी उत्तीर्ण झाली होती. मात्र जया हिला कमी गुण मिळाले होते तरीही जयाला पुढे शिक्षण करावयाचे होते तसे तिने वडिलांना सांगितले होते. त्यामुळे विजय राठोड यांनी तिच्या अकरावीच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक महाविद्यालयांत चौकशी केली . गुण कमी असल्याने तिला प्रवेश मिळण्यात अडचणी येत होत्या. दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे असे समजल्यास घाटनांद्रा ता. मेहकर येथील कु.जया विजय राठोड या विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याच्या भीतीने जयाने आत्महत्या केली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षांपासून नापिकीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मागील वर्षी पेरणीसाठी काढलेले बँकेचे ५0 हजार रुपये कर्ज डोक्यावर आहे. यावर्षी सुद्धा पेरणीसाठी उसणवारी करावी लागली. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे विजय राठोड यांना मुलीच्या शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागणार होता. मुलींच्या शिक्षणावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही गरिबीमुळे अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याच गरिबीमुळे आज पुन्हा एका सावित्रीला आपली जीवनयात्रा संपवावी लागली.

Post a Comment