BREAKING NEWS

Wednesday, July 27, 2016

सासरच्या जाचापायी २६ वर्षीय विवाहीतेची आत्महत्या टेंभूर्णी येथील घटना


चांदूर रेल्वेः / शहेजाद खान /---


सासरच्या जाचापायी एका २६ वर्षीय विवाहितेने आईवडिलांच्या घरी गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता तालुक्यातील टेंभूर्णी या गावी घडली. रेश्मा सचिन काळे  वय २६ असे त्या विवाहितेचे नाव आहे.
रेश्मा हिचा विवाह दीड महिण्यापूर्वी अमरावती येथील विलास नगरातील सचिन काळे यांच्याशी झाला होता. घटनेच्या दिवशी विवाहितेचे आईवडिल शेतावर कामावर  गेले असतांना दूपारी चार वा.रेश्मा हिने स्वतःच्या ओढनीने गळफास लावुन आत्महत्या केली. विवाहितेचा भाऊ घरी परतला तेव्हा घराचे दार आतुन बंद होते. आवाज दिल्यानंतरही घरातून होकार येत नसल्याने त्याने खिडकीतुन आत डोकावले असता रेश्माने गळफास लावलेली दिसली.त्याने त्वरीत स्थानिक ग्रामीण रूग्णालयात आनले मात्र रेश्माचा मृत्यू झाला होता. मृतक रेश्मा चा दिड महिण्यापूर्वी ९ जुन २०१६ ला विवाह झाला होता. सासु सासरे व पती छळ करीत होते. त्यामुळे रेश्मा ने आत्महत्या केल्याचा आरोप रेश्माचे वडिल चरणराव जंवजाळ यांनी केला. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास करीत आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.