चांदूर रेल्वे - (शहेजाद खान)-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार, हक्क दिले असून लोकशाही मार्गाने निवडणूक सुद्धा लढण्याचा अधिकार दिला आहे. मात्र देशाच्या राजकारणाचा पाया असलेल्या ग्रामीण पातळीवरील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये गावातील प्रस्तापित नेत्यांच्या राजकारणामुळे आज इतर समाजांवर अन्याय होतांना दिसून येत आहे. असंच उदाहरण चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायतमध्ये दिसून आले असून यामध्ये पहिल्यांदाच मागासवर्गीय सरपंच म्हणून गावातील योगेश मेश्राम यांना निवडण्यात आलाय.
राजुरा ग्रामपंचायतीची स्थापना 1060 ला झाली तर 1966 पासून ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. मात्र तेव्हापासूनच अजूनही या 56 वर्षात कधीच मागासवर्गीय सरपंचपदी नियुक्त झाला नाही.
त्यामुळे राजुरा ग्रामपंचायतीत मागासवर्गीय लोकप्रतिनिधी आणि जनतेवर अन्याय होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र आता नुकतीच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कविता गुल्हाने या सरपंचा झाल्या होत्या. मात्र एकाच वर्षात त्यांच्यावर अविश्वास ठराव सिध्द झाल्याने अखेर मागासवर्गीय उमेदवाराला सरपंचपदाचा मान भेटला आहे. चक्क 56 वर्षानंतर राजुरा ग्रामपंचायत मध्ये मागासवर्गीय उमेदवार सरपंच झाल्याने सगळीकडे आनंद व्यक्त केल्या जात आहे. राजुरा ग्रामपंचायतीत ओबीसी 2 हजार 500, एससी 700, एनटी 300 अशा प्रकारे मतदारांची संख्या आहे. अशात आता योगेश मेश्राम यांनी सरपंचपदाचा धुरा संभाळल्याने गावात आनंद व्यक्त होतोय.
----------------------------------------
🔹 🔹 ग्रामपंचायत अंतर्गत सार्वत्रिक विकासासाठी लढणार - योगेश मेश्राम, सरपंच 🔹 🔹
राजुरा ग्रामपंचायत मध्ये पहिला मागासवर्गीय सरपंच होण्याचा मान मिळाल्याचा मला आनंद आणि दुःख दोन्ही आहे. कारण माझ्या समाजाला याआधीच न्याय मिळायला पाहिजे होता. मात्र तो मिळाला नसल्याने मी आज पहिला मागासवर्गीय सरपंच म्हणून घोषित झाल्यानंतर मला आनंद झालाय. ग्रामपंचायत अंतर्गत आता मी सार्वत्रिक विकासासाठी लढणार असल्याचा संकल्प घेतला आहे. गावातील बेरोजगारी, आरोग्य, रस्ते, नाल्या, यासह लागणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

Post a Comment