चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-/
शहरातील विविध मागण्यांसाठी अनेकजण उपोषण करतात. मात्र चांदुर शहरात यंदा काही वेगळेच पहावयास मिळणार आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक कामे खोळंबली आहे. वारंवार तक्रारी देवुनही कोणतीही समस्या निकाली न काढल्यामुळे नगरसेवक नितीन गवळी उद्या 18 जुलैपासुन उपोषणाला बसणार आहे. चक्क एक नगरसेवकच उपोषणाला बसणार असल्यामुळे नगरपरीषद प्रशासन मात्र हादरणार आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे दिवसेंदिवस चांदुर रेल्वे नगरपरीषद चर्चेचा विषय बनत आहे. शहरातील समस्येंकडे त्यांचे कोणतेही लक्ष नसुन दिवसेंदिवस समस्या वाढतच चालल्या आल्या. अनेक तक्रारी देवुनही समस्या निकाली काढल्या जात नाही आहे. यामुळेच त्रस्त शिक्षण, आरोग्य व स्वच्छता नितीन गवळी यांनी शहरातील विविध मागण्यांसाठी 18 जुलैपासुन उपोषणाला बसण्याचा इशारा एका निवेदनाव्दारे मुख्याधिकारी यांना दिला असतांना त्यांच्या 9 मागण्यांपैकी काही मागण्या उपोषणाला बसण्यापुर्वीच मान्य ही झाल्या. यामधील म्हाडा घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात येत आहे तसेच अपंगाच्या निधीतील नगरपरीषद अंतर्गत सन 2015-16 या आर्थिक वर्षात 169000 रूपयाचे साहित्य खरेदी केले असुन अपंगांना त्या साहित्याचे वाटप लवकरच करण्यात येणार आहे. मंगलमुर्ती नगर मधील समाज मंदिराच्या कामाचे 1123800 रूपयांचे अंदाजपत्रक तयार झाले असुन येत्या काही दिवसात निवीदा प्रसिध्द करण्यात येणार आहे. मात्र इतर मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे नितीन गवळींनी उपोषण स्थगितीला नकार दिला असुन उद्यापासुन नगरपरीषद समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. यामध्ये प्रवासी निवाऱ्याचे काम त्वरीत करीवे, तुटलेली खेळणी त्वरीत लावावे, डंपींग हाउसवरील काम तातडीने बंद करावे, शेंद्रीपुरा येथील पाईपलाईनचे काम त्वरीत करावे आदी मागण्यांचा समावेश आहे. एक नगरसेवकच शहरातील मागण्यांसाठी उपोषणाला बसणार असल्यामुळे नगरपरीषद प्रशासन मात्र हादरणार आहे एवढे मात्र नक्की..
Post a Comment