चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. शहरातील मेहेरबाबा नगरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी जमा होत असुन घाणीचे साम्राज्य निर्मान होत आहे. निवेदन देवुनही दखल न घेतल्यामुळे तसेच मुख्याधिकारी, प्रभागातील नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे त्रस्त नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात असुन या रस्त्याचे काम तातडीने करून देण्यात यावे अशी मागणी करीत आहे.
स्थानिक नगरपरीषद अंतर्गत येत असलेल्या मेहरबाबा नगर परीसरातील डिपी लगतच्या श्री. खोब्रागडे यांच्या घरापासुन ते श्री. पवार यांच्या घरापर्यंत रोडचे काम अनेक महिन्यांपासुन झालेले नाही. या रोडवर पुर्णत: माती असुन मोठे खड्डे पडले आहे. पावसामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्मान होत आहे. पाणी आल्यानंतर या रस्त्यावरून नागरीकांना चालनेही कठीण होत आहे. याचे निवेदन काही दिवसांपुर्वी या परीसरातील नागरीकांनी मुख्याधिकारी यांना दिले होते. मात्र या निवेदनाची अद्यापही कोणीही दखल घेतली नसुन कोणताही अधिकारी या ठिकानी पाहनी करण्याकरीता आलेला नाही. तसेच प्रभागातील नगरसेवक सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काही नागरीकांनी केला आहे. तरी या रस्त्याचे काम तातडीने करून देण्यात यावे अशी मागणी शेख सलीम, बानो शाह, आकाश सोनवने, सुभाष तांडेकर, रशीद खान, शेख मुख्तार, सै. रहेमत, सै. फारूक, शिवा तांडेकर, बाबाराव नेवारे आदींनी केली असुन अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे..

Post a Comment