दहिवली (जिल्हा पुणे),
- सनातन प्रभात हे राष्ट्रजागरण करणारे वृत्तपत्र आहे. सनातन संस्था आणि दैनिक सनातन प्रभात यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे साधनारत राहून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य हातून होत आहे, असे मार्गदर्शन प.पू. श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांनी केले. दहिवली (पुणे) येथील स्वामी करपात्री फौंडेशन आणि अखिल भारतवर्षीय धर्मसंघ संस्कार शाला या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प.पू. श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांची १९ जुलै या दिवशी भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते. या वेळी प.पू. श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांचा दैनिक सनातन प्रभातचा गुरुपौर्णिमा विशेषांक, श्रीफळ आणि भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

ते पुढे म्हणाले, हे धर्मकार्य असेच उत्तरोत्तर वाढत रहाणार. हे
प्रसादरूपी दैनिक देऊन तुम्ही आम्हाला प्रसन्न केले. आम्ही सनातनच्या
रामनाथी आश्रमाला अवश्य भेट देऊ. भेटीस आलेल्या साधकांची नम्रता पाहून एवढी
विनम्रता कुठून शिकलात ? असे आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी उज्जैन येथील
सिंहस्थ कुंभमेळ्यात भेटलेल्या सनातन संस्थेच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि
सनातनचे संत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची आस्थेने चौकशी केली.
या वेळी त्यांचे गुरुबंधू प.पू. श्री गुणप्रकाश चैतन्यजी महाराज
यांचाही पाक्षिक सनातन प्रभात आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
त्यांनाही आश्रमात येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
Post a Comment