प्रमोद नैकेले /----
*अचलपूर*:- राष्ट्रीय विद्यालय कर्मचारी पतसंस्था रजि.नं.४०२ मर्यादित अचलपूर ची एकोणतीसावी सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एम.के.येवूल यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रीय हायस्कूल चे प्राचार्य पी.एन.सुरपाटणे,राष्ट्रीय प्रायमरीचे मुख्याध्यापक एच.डी.पुरोहित,आदर्श विद्यालया भुगावचे आर.के.गादे,सत्कारमुर्ती एम.के.पिदडी प्रामुख्याने उपस्थीत होते.सचिव सोमेश्वर बोरवार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सभेला प्रारंभ केला त्यांनी
वर्ष १५/१६ चे तेरीज,ताळेबंद,नफातोटा व अंदाजपत्रक सभेसमोर मांडला त्यावर चर्चा होवून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले.संस्थेची उत्तरोत्तर प्रगती सदस्यांचे सहकार्य यावर अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्य सफल झाल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले.चर्चेत प्रामुख्याने राजू केदारे,अरूण सुने,बी.एम.कोल्हे,ए.बी.कडू,शिंगणे,काळे यांनी सहभाग घेतला.सहकारी बँकेवर प्रतिनिधी म्हणून बी.आर.नकाशे व सहकारी बोर्ड वर बी.एम.कोल्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.याप्रसंगी सेवानीवृती प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एम.के.पिदडी यांना निरोप व सत्कार करण्यात आला,राष्ट्रीय हायस्कूल चे सेवानीवृती उपमुख्याध्यापक बी.एस.अग्रवाल यांचा सुध्दा सत्कार आयोजित केला होता पण ते बाहेर गावी गेले असल्याने सचिवांनी सत्कार होवू शकला नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात एम.के.येवूल यांनी सचिव एस.व्ही.बोरवार यांचे कार्यावर समाधान व्यक्त केले तसेच सर्व सदस्य,तीनही शाळेचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभत असल्यामुळे पतसंस्था प्रगती पथावर वाटचाल करीत आहे असे मत व्यक्त केले सहायक निबंधक कार्यालय व अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अचलपूर व परतवाडा यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते तसेच हे सभागृह आमच्या शाळेचे असून आमच्या मातृसंस्थेचे अध्यक्ष,सचिव व सदस्य तसेच अप्रत्यक्षपणे ज्यांचे सहकार्य लागते त्यांचे आभार व्यक्त केले.
Wednesday, August 31, 2016
*राष्ट्रीय विद्यालय कर्मचारी पत संस्थेची एकोणतीसावी आमसभा संपन्न*
Posted by vidarbha on 7:30:00 AM in | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment