गजानन काळुसे / सिंदखेड राजा /---
सिंदखेड राजा सेवासंकल्प प्रतिष्ठान बुलडाणा यांना बांधकाम निधी म्हणुन 25,000 रूपयाचा धनादेश मातृतीर्थ प्रतिष्ठान सिंदखेड राजा यांनी सेवासंकल्पचे श्री नंदुभाऊ पालवे व श्री अविनाशभाऊ चव्हान यांना सिंदखेड राजा येथे देण्यात आला.सेवासंकल्प प्रतिष्ठान हे आज चिखली आणि बुलडाणा येथील मनोरुग्न,रस्त्याने फिरणारे मनोरुग्न,बसस्टैंडवर पडणारे मनोरुग्न,कोनिही बेवारस सोडलेले स्त्रीअथवा पुरुष यांना रोजचे जेवण हे रुग्ण जिथे असतील तिथे नेवुन त्यांना सेवासंकल्प वाले देतात.त्यांना झालेल्या जखमा ड्रैसिंग करुण त्यांच्यावर इलाज करतात.आता या मनोरुग्णांना सेवासंकल्प एका छ्ताखाली आणण्यासाठी पळसखेड सपकाळ (चिखली) येथे काही खोल्यांचे बांधकाम करुण त्यांची संपुर्ण देखभाल करणार आहे.
एका खोलीचे बांधकाम सुरु आहे.या आधी बांधकामा साठी मातृतीर्थ प्रतिष्ठान सिंदखेड राजा यांनी सेवासंकल्पला एकदा 50,000रु.पुन्हा एक वेळ 25,000रु.आणि आज पुन्हा एक वेळ25,000रु.असे एकूण 1,00000 लाख रुपयांची मदत मातृतीर्थ ने सेवासंकल्पला आतापर्यंत केली आहे. हा मदत निधी योग्य लोकांवर व लोकांसाठी खर्च होत आहे.
लवकरच हे मनोरुग्न एका ठिकाणी निवास व जेवण आणि संपुर्ण देखभाली साठी आणल्या जाणार आहे.मातृतीर्थची मदत देतांना डॉ.विलास खुरपे, डॉ.शिवानंद जायभाये, श्री रमेशआप्पा खुरपे, अमोल भाट सर,डॉ.संजय दसरे,वैभव मिनासे,भारत जायभाये,खुशाल नागरे सर,सेवासंकल्पचे नंदुभाऊ पालवे,अविनाशभाऊ चव्हान सिंदखेड राजा येथे उपस्थीत होते.
Post a Comment