गजानन काळूसे/ सिंधखेड राजा /----
सत्यजित अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा श्याम उमाळकर यांच्या मागील ३0 ते ३५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकताना मुकुल वासनिक यांनी श्याम उमाळकरांचे अनेक पैलू उलगडले. मुकुल वासनिक म्हणाले, की श्याम उमाळकर अष्टपैलू नेतृत्व आहे. हा माणूस कधी नेता तर कधी अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतो. राजकीय व्यासपीठावर भाषण करताना प्रभावी वक्ता वाटतो. तर सामान्यांच्या प्रश्नासाठी झटताना एखादा मुद्दा पटवून देताना श्याम महाअभिवक्त्याच्या भूमिकेत दिसतात. अनेक लखोपती, करोडोपती आपण बघितले. पण, श्याम उमाळकरांचे सत्यजित अर्बनच्या माध्यमातून केवळ लखोपती नव्हे तर विश्वासपतीचे दर्शन घडते. एवढा विश्वास त्यांनी बँकिंग क्षेत्रात निर्माण केला आहे. आर्थिक स्थिरता असली तरच संस्था टिकतात. त्यासाठी मात्र केवळ व्यापारी बुद्धीने काम चालत नाही. त्याला सामाजिक बांधीलकीची जोडसुद्धा आवश्यक आहे. ती बांधीलकी उमाळकरांकडे आहे म्हणूनच त्यांनी या क्षेत्रात झापट्याने एवढी प्रगती केल्याचे सांगून मुकुल वासनिक यांनी श्याम उमाळकरांच्या बँकिंग क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले. आता पक्षासाठी काम करायचे शाम उमाळकर यांनी भाषणात आपल्या राजकिय व सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, पक्षाने आपल्याला अनेक पदे दिली. सन्मान केला. पक्षाच्या अध्यक्षपदापासून तर विविध जिल्हा व ईतर राज्यातही काम करण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली होती. ह्या जबाबदार्या सर्मथपणे आपण सांभाळल्या आता मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वात पक्षाचे काम शेवटपर्यंत करायचे आहे. पक्ष आदेश देईल त्या जाबाबदार्या आपण सांभाळू असेही ते म्हणाले. सिंदखेड राजा: व्यापारी बुद्धिमत्ता असल्याशिवाय कोणताही व्यवसाय थाटत नाही. ती बुद्धिमत्ता श्याम उमाळकर यांच्यात असल्याने सत्यजित परिवाराच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले. हे सर्व करीत असताना सत्यजित परिवाराने सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे काम केले. तर श्याम उमाळकरांनी संस्थेच्या माध्यमातून पक्षाचीही पत वाढविली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी दुसरबीड येथील सत्यजित अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखा शुभारंभाप्रसंगी केले. शेतकर्यांना कर्ज पुरवठा करणार्या जिल्हा सहकारी बँकेबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही. तेव्हा शेतकर्यांना कर्जपुरवठा करून त्यांनाही पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार्य करा, असा सल्लाही मुकुल वासनिक यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आ. राहुल बोंद्रे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पक्ष निरीक्षक माजी आमदार विजय खडसे, तर व्यासपीठावर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय राठोड, जि.प. अध्यक्ष अलका खंडारे, माजी आमदार बाबूराव पाटील, माजी आ. जनाभाऊ बोंद्रे, विजय अंभोरे, नरेंद्र खेडेकर, शिवदास रिंढे, प्रदीप नागरे, लक्ष्मणराव घुमरे, अंकुश वाघ, गणेश बस्सी, भास्करराव ठाकरे, तुकाराम खांदेभराड, प्रकाश पाटील, अनिता रणबावरे, वर्षा वनारे, अरविंद कोलते, बलदेवराव चोपडे, मुख्त्यारसिंग राजपूत, वामन झोरे, राजेश मापारी, कासम गवळी, अभय चव्हाण, विष्णू पाटील, रामविजय बुरुंगले, मनोज कायंदे, मिनल आंबेकर, जयश्री शेळके, हाजीसेठ मिरचीवाले, स्वाती वाकेकर, ज्ञानेश्वर चिभडे, कैलास सुखदाने, अँड. अनंतराव वानखेडे, बद्रीसेठ वाघ, अनिल सावजी, मन्नान कुरेशी, विष्णूपंत पाखरे, सत्यजित खरात, सरपंच राखी वैभव देशमुख, संजय सावजी, डॉ.डी.एस.शिंदे, डॉ.गणेश सानप, डॉ.राजेश वाघ, कैलासराव देशमुख, दिलीप देशमुख, वसंतराव जायभाये उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.राहुल बोंद्रे यांनी श्याम उमाळकर यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रभावी वक्तृत्वातून श्याम उमाळकर यांनी संस्थेचा २५ वर्षांत चढता आलेख मांडला. संस्थेचा वर्धापन दिन साजरा करत असताना मुकुल वासनिकसारखे नेते लाभले, म्हणून त्यांचा चांदीचा पंजा देऊन सत्कार केला. त्याला सोन्याचा मुलायम चढविला आहे. राजकीय क्षेत्रात प्रवेश करताना वासनिकांची करंगळी धरली. मनगट धरुन पक्षाचे काम केले. ३२ वर्षांत सर्वकाही पक्षाने मला दिले, मलाच नाही तर कुणाला आमदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष, सभापती ही सर्व पदे मिळाली. त्यामुळे शेवटपर्यंत पक्षाचे काम करणे हे माझे कर्तव्य समजतो. काँग्रेसमधून संस्था उभी केली. आता संस्थेच्या माध्यमातून काँग्रेस चालविण्याचे काम करणार असून, रिंढे, नागरे, कायंदे यांनी सैराट होऊन काम करावे. पण, पक्षाच्या दागिन्याला सुद्धा जपावे, असा सल्लाही उपस्थित कार्यकर्त्यांना उमाळकर यांनी दिला.
Post a Comment