नागपूर /भीमराव लोणारे /---
महावितरण मधील
विद्युतिय कामे बेरोजगार विद्युत अभियंत्यांना बिना स्पर्धा थेट लॉटरी पद्धतीने
देण्याचे धोरण आहे, या धोरणानुसार महावितरणच्या नागपूर ग्रामिण मंडलने तब्बल 1 कोटी 30 लाखांच्या कामांचे वाटप लॉटरी पद्धतीने 19 बेरोजगार अभियंत्यांमध्ये केले आहे.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महावितरण मधील कामे थेट
लॉटरी पद्धतीने देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणीला सुरुवात झाली असून
यांतर्गत महावितरण मधील विभागांतर्गत एकूण पार पाडावयाच्या वार्षिक कामांपैकी
सरासरी किमान ५० टक्के कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात येत आहेत. त्यानुसार नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक
अभियंता श्री राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेत एका समितीचे गठन करण्यात आले होते, या समितीत कार्यकारी अभियंता श्री सुहास मेत्रे, कार्यकारी अभियंता श्री एस.एस. सदामते, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री गजानन जयस्वाल आणि
उपकार्यकरी अभियंता श्री जयंत ठाकरे यांचा समावेश होता. या समितीने उपस्थित सर्व बेरोजगार
अभियंत्यांसमोर सोडत पद्धतीने क्रमवार कामांचे वाटप केले. या सोदतीत 19 बेरोजगार अभियंत्यांमध्ये तब्बल 1 कोटी 30 लाख रुपयांच्या कामांचे वाटप करण्यात आले.
-- सोडतीव्दारे कामांचे वाटप करतांना अधीक्षक अभियंता श्री राजेंद्र
पवार व सोबत इतर
Post a Comment