BREAKING NEWS

Friday, September 9, 2016

समाजाला सात्त्विकता देण्यासाठी सनातन संस्थेची आवश्यकता ! - भाजप नगरसेवक दिलीप काळोखे

पुणे - सनातन संस्थेचे कार्य चांगले असून ते समाजाला उपयुक्त आहे. आज समाजात सात्त्विकता हवी असून ती देण्यासाठी सनातन संस्थेची आवश्यकता आहे. समाजाने अशा चैतन्यदायी प्रदर्शनाचा लाभ घेऊन धर्माचरणाची कास धरावी. त्यासाठी सनातन संस्थेचे मार्गदर्शन घ्यावे, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक आणि कसबा-विश्राम प्रभाग समिती अध्यक्ष श्री. दिलीप काळोखे यांनी केले. येथील बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यानासमोर सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून महर्षींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चैतन्यदायी धर्मरथ ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. काळोखे यांनी धर्मरथपूजन आणि श्रीफळ वाढवून केले. या वेळी श्री. काळोखे यांनी संपूर्ण प्रदर्शन सनातनचे साधक श्री. शिरीष शहा यांच्याकडून जिज्ञासेने जाणून घेतले आणि काही ग्रंथ, सात्त्विक उत्पादनेही खरेदी केली.
         सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथ ग्रंथ प्रदर्शन हे ८ ते १४ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. 
या प्रदर्शनात काय पहाल ?
  • श्री गणेशपूजनामागील शास्त्रविषयक फलक
  • धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स फलक
  • सनातनची विविध सात्त्विक उत्पादने, राष्ट्र आणि धर्म विषयक ग्रंथ, देवतांची छायाचित्रे आणि नामपट्ट्या

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.