चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
जिल्हा सरकारी रुग्णालयापासून खेडेगावापर्यंत जागोजागी सरकारी आरोग्य यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यात आलेले आहे. मात्र, हे जाळे विरले असून सर्वसामान्यांना आरोग्य सेवेसाठी खासगी ठिकाणी उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे. कारण शहरातील ग्रामिण रूग्णालयात औषधींचा तुटवडा असुन आरोग्य सेवा ऑक्सीजनवर असल्याचे चित्र पहावयात मिळत आहे. त्यामुळे रूग्णांचे बेहाल होत आहे. मात्र याकडे वैद्यकीय अधिक्षकांनी दुर्लक्ष केले आहे.
सर्वसामान्यांना मोफत व चांगल्या आरोग्य सुविधेचा लाभ व्हावा यासाठी सगळीकडे सरकारी रूग्णालय निर्माण करण्यात आले आहे. मात्र शहरातील ग्रामिण रूग्णालयातील आरोग्य सेवेचे तीन-तेरा वाजले आहे. रूग्णालयात औषधींचा तुटवडा असुन साध्या गोळ्याही रूग्णालयात उपलब्ध नाही. तसेच रूग्णालयात अस्वच्छतेमुळे सगळीकडे घाणीचे साम्राज्य निर्मान झाले आहे. याव्यतीरीक्त रूग्णालयातील महिला कर्मचारी व इतर काही कर्मचारी रूग्णांशी असभ्य वागणुक करत असल्याचीही बाब समोर आली आहे. रूग्णालयात लिपीकाचे पद गेल्या ३ महिन्यांपासुन रीक्त असुन काही कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांपासुन पगार सुध्दा झालेले नाही. तसेच डॉक्टरांकडुन चांगल़्या वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याचेही काही रुग्णांनी सांगितले. यामुळे रूग्णालयात रूग्णांचे बेहाल होत असुन रुग्णालय सोयीचे कमी, गैरसोयीचेच अधिक बनले आहे. ऐवढे असतांनासुध्दा वैद्यकीय अधिक्षक झोपेचे झोंग घेत असुन या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. तरी वरीष्ठांनी याकडे लक्ष देवुन रुग्णालयातील सोयीसुविधा आणि कामकाजात तत्काळ सुधारणा करावी अशी मागणी शहरवासी करीत आहे..

Post a Comment