BREAKING NEWS

Wednesday, September 21, 2016

अपेक्षा होमिओ सोसायटीच्या वतीने ‘ युवा परिषद ‘-नाम फाउंडेशनचे विदर्भ, खांदेशचे प्रमुख हरिष इथापे यांनी युवक-युवतींना मोलाचे मार्गदर्शन


चांदूर रेल्वेः/शहेजाद खान /----


अपेक्षा होमिओ सोसायटीच्या वतीने स्थानिक सभागृहात ‘ युवा परिषद ‘ घेण्यात आली. यावेळी नाम फाउंडेशनचे विदर्भ, खांदेशचे प्रमुख हरिष इथापे यांनी युवक-युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन काळे, प्रमुख पाहूणे म्हणून मारोती चवरे, संजिवनी ठाकरे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाम फाउंडेशनचे विदर्भ, खांदेश प्रमुख हरिष इथापे उपस्थित होते.‘चला स्वप्न पाहू या ‘ या विधानाने कार्यशाळेची सुरूवात झाली. नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वेच्या ३०० युवक युवतींनी गीत गा रहे हम ! या समुह गितांने वातावरण चैतन्यमय व स्पुâर्तीमय केले.‘ युवकांची आजची दशा व दिशा ‘ या विषयावर हरिष इथापे यांनी युवक, युवतींशी संवाद साधला. संवादात्मक चर्चा करतांना युवकांच्या प्रश्नांना हात घातला. आजची पॅâशन, युवतीच्या समस्या व समाजाचा दृष्टीकोन, आपले आचरण, आपणच आपली फसवणूक करीत आहोत. आपण सर्व युवक-युवती भूमिपूत्र असतांना सुध्दा शेतकरी मुला-मुलींसोबत लग्न करायला तयार नाहीत हे विदारक सत्य पूढे मांडले. शेतकऱ्यांचा खुप समस्या आहेत. विदर्भातील शेतकरी विवंचनेत अडकला असतांना आपण युवक-युवतींनी आईबाबांचे हात व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण अट्टाहास न करता आपले स्वप्न-आपले भविष्य उज्वल करण्याचा प्रयत्न करावा. जाती-पातीच्या विळखा समाजाला विघातक आहे, त्यातून अमानुषता वाढली आहे. ती व्यवस्था नष्ट व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहीजे असे मत कु.मानवटकर हिने मांडले.
यावेळी अनेक युवक-युवतींच्या समस्या युवकांनी मांडल्या. त्याचे निराकरण हरिष इथापे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल धनविजय, रमेश मोठे, संजिवनी पवार, सोमेसर, सी.डी.चांदूरकर, मनुताई वरठी, रंजना राजपुत यांनी परिश्रम घेतले.युवा परिषदेला चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्याील युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.