भांडुप-- येथील लालासेठ कंपाऊंड मधील
'ज्येष्ठ नागरिक मंच' आणि उत्कर्षनगर येथील दैनिक 'सनातन प्रभात'चे वाचक
श्री. प्रदीप (दादा) नेरुरकर यांच्या निवासस्थानी २४ सप्टेंबर या दिवशी
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 'श्राद्धाचे महत्त्व' या विषयावर
मार्गदर्शन करण्यात आले. समितीच्या वतीने श्री. लक्ष्मण जठार यांनी
'पितृपक्षात श्राद्धविधी का करावा ?', 'श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र
आणि त्यामागील आध्यात्मिक लाभ' यांविषयी माहिती दिली. या मार्गदर्शनानंतर
श्री. नेरूरकर यांनी त्यांच्या भागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यास
सांगितले. 'नवरात्रोत्सवातही धर्मशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शनाचे आयोजन
करू', असे श्री. नेरुरकर यांनी या वेळी सांगितले.
Post a Comment