BREAKING NEWS

Thursday, September 8, 2016

*अचलपूर तालुक्याचा औद्योगिक विकास व्हावा*अचलपुर युवा संघर्ष समितीचे आवाहन.

प्रमोद नैकेले /-
*अचलपुर*:-
स्वातंत्र्य मिळून सात दशक निघून गेले पण अचलपूर व तालुक्याच्या नशिबी आले फक्त अठरावीश्व दारीद्र येथील युवा पिढीच्या वाट्याला आले.अनेक राजकीय पक्षांनी व नेत्यांनी येथे आपली राजकीय ओळख निर्माण केली आमदार,खासदार व मंत्री होवून आपल्या सतरा पिढ्यांची बीनफिकीरीची सोय करून घेतली याला काही अपवाद आहेत पण या तालुक्याच्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे असे कुणीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही येथील युवा शक्ती रोजगाराच्या शोधात गोवा,दमन,मुंबई,व इतर प्रांतात भटकत आहेत ही व्यथा मांडण्याकरिता युवा संघर्ष समितीने एलगार पुकारला आहे.
  उदया 7 संप्टेबरला सकाली 11वाजता अचलपुर तालुक्यामध्ये औद्योगिक विकास व्हावा आणि भंगार पडलेला बसस्थानक परीसरात भव्य क्रिङा संकुल निर्मीती ची मागणी चे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्य मंञी साहेब याना दिले जाणार आहे. मागण्या खालील प्रमाणे- अचलपुर तालुक्यात  औद्योगिक विकास करणयाबाबत. 1) महत्वपूर्ण प्रकल्प आणण्याबाबत. 2) स्थानकांना प्रथम प्राधान्य 3) तालुका तेथे औद्योगिक प्रकल्प राबविण्याबाबत.4) तालुका स्तरावर तालुका उद्योग मार्ग दर्शन केन्द्र सुरू करण्या बाबत.5) भव्य क्रिङा संकुल बाधण्याबाबत.शासनाने वरील सर्व मागण्या बाबत ठोस निर्णय घ्यावा.यासाठी उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना निवेदन देण्यात येईल तेंव्हा जास्तीत जास्त संख्येने युवकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन सागर पुरोहित व संघर्ष समितीने केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.