संभाजीनगर - मुंबईच्या धर्तीवर येथील विक्री योग्य भूखंडावरील ५००
चौरस मीटरपर्यंतची मंदिरे ही नोंदणी आणि मुद्रांक रकमेच्या २० प्रतिशत
रक्कम भरून अधिकृत करण्यात यावी, यासाठीचे धोरण सिद्ध करून सिडकोकडे पाठवले
आहे, असेे शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी सिडकोच्या
समस्यांविषयी मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांच्या दालनात घेतलेल्या
बैठकीत स्पष्ट केले येथील
कोणतीही धार्मिक स्थळे पाडण्याची कारवाई केली जाणार नसून मोकळ्या जागेतील
मंदिरे वाचवण्यासाठी मंत्रालय स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे.
सद्यस्थितीतील भाडे करार (लीज) स्थगित करण्याच्या संदर्भातही वरिष्ठ
पातळीवर चर्चा चालू असल्याचे सुनील केंद्रेकर यांनी याच बैठकीत सांगितले.
Post a Comment