सोलापूर येथील फिरत्या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन !
![]() |
ग्रंथप्रदर्शन पहातांना ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे आणि समवेत जिज्ञासू |
सोलापूर- धर्मजागृतीसाठी सनातन संस्थेच्या
ग्रंथप्रदर्शनाची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय
वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. सनातनच्या
फिरत्या ग्रंथप्रदर्शनाचा सोलापुरातील जिज्ञासूंनी अवश्य लाभ घ्यावा, असे
आवाहन करत त्यांनी सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची प्रशंसाही केली आणि
कार्याला शुभेच्छा दिल्या. येथील दत्त चौकात फिरत्या प्रदर्शनाचे
उद्घाटनही त्यांच्याच हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी
सनातनचे साधक आणि जिज्ञासू उपस्थित होते. हे ग्रंथप्रदर्शन सोलापूर येथील
दत्त चौकात १८ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९
पर्यंत चालू रहाणार आहे.
Post a Comment