
गणेशोत्सवाच्या निमित्ताने रणरागिणी शाखेच्या वतीने मुंबईत ठिकठिकाणी मार्गदर्शन !
गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी
शाखेच्या वतीने मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांत धर्माचरण, धर्मशिक्षणाची
आवश्यकता आणि स्वसंरक्षण काळाची गरज यांविषयी महिलांमध्ये जागृती करण्यात
आली.
१. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील फोर्टचा इच्छापूर्ती राजा या मंडळाच्या
वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन
करण्यात आले. या वेळी १०० हून अधिक महिला उपस्थित होत्या. यातील बोरिवली
येथील महिलांनी नवरात्रातही अशाप्रकारचे प्रवचन घ्यायला हवे अशी मागणी
केली.
२. चर्चगेट येथील बॅकबे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मार्गदर्शनाच्या वेळी
स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. तसेच परेल, काळाचौकी
येथील आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या मार्गदर्शनाचा
१२० हून अधिक जणांनी लाभ घेतला.
३. चांदिवली येथील लोकमिलन सोसायटी, घाटकोपर येथील कणसे चाळ गणेशोत्सव
मंडळ, मुलुंड (प.) येथील केशवपाडा मित्र मंडळ आदी ठिकाणी शारीरिक, मानसिक
आणि आध्यात्मिकरित्या सक्षम होण्यासाठी रणरागिणी शाखेमध्ये सहभागी होण्याचे
उपस्थित महिलांना आवाहन करण्यात आले. या वेळी आदर्श गणेशोत्सवाविषयीही
माहिती देण्यात आली.
क्षणचित्रे
१. चांदिवलीतील लोकमिलन सोसायटी येथील व्याख्यानात ध्वनिचित्र चकती
(व्हिडिओ सीडी) दाखवण्यासाठी प्रोजेक्टर लागणार होता. सोसायटीतील रहिवाशी
श्री. यलगलदास जगन्नाथ यांनी स्वतःच्या शिकवणीवर्गातील प्रोजेक्टर उपलब्ध
करून दिला.
२. मुलुंड (प.) येथील केशवपाडा मित्र मंडळ येथे प्रवचन झाल्यानंतर सामूहिक
अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने
श्री. श्रीकृष्ण जोशी यांनी गणरायासमोर अथर्वशीर्षाचा संकल्प केला.
३. घाटकोपर येथील कणसे चाळ गणेशोत्सव मंडळात कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित
सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.
४. कोपरखैरणे (नवी मुंबई) येथील सामना मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. केशव
पाटील यांनी त्यांच्या मंडळासाठी प्रत्येक आठवड्याला धर्मशिक्षण आयोजित करू
शकतो असे सांगितले.
या वर्षीच्या गणेशोत्सवात झालेला प्रसार !
१. व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून ८५०० लोकांपर्यंत आदर्श गणेशोत्सवाचा विषय पोचवण्यात आला.
२. २८१ भित्तीपत्रके लावण्यात आली.
३. ८०० हून अधिक हस्तपत्रकांचे वितरण करण्यात आले, तर अंधेरी येथे १५०
सनातननिर्मित सात्विक उत्पादने असलेल्या पूजासाहित्य संचांचे वितरण करण्यात
आले
Post a Comment