कु. अदिती सुखटणकर यांचे मार्गदर्शन ऐकतांना जिज्ञासू |
एर्नाकुलम् (केरळ) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने
कुझिक्काट भगवती मंदिरात पितृपक्ष या विषयावर प्रवचन घेण्यात आले. या वेळी
समितीच्या कु. अदिती सुखटणकर यांनी धर्माचरणाच्या अंतर्गत कुंकू लावणे,
प्रार्थना करणे यांविषयीही माहिती दिली. या प्रवचनासाठी मंदिराच्या
विश्वस्तांनी पुढाकार घेतला होता. या विश्वस्तांनी दर आठवड्याला सत्संग
घेण्याची मागणी केली आहे.
क्षणचित्र
केरळमध्ये अनेकांना पितृपक्ष ज्ञात नाही. येथील लोक शिवरात्री आणि
गुरुपौर्णिमेनंतरच्या अमावस्येला श्राद्ध करतात. पितृपक्षात श्राद्ध
करण्याचे महत्त्व आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व सांगितल्यावर उपस्थित
जिज्ञासूंनी ते त्वरित स्वीकारले. त्याचबरोबर अनेकांनी या पंधरवड्यात
श्राद्ध विधी करण्याची सिद्धता दर्शवली. ही घटना खूप अपूर्व वाटली.
Post a Comment