BREAKING NEWS

Friday, September 23, 2016

गांधी जयंतीदिनी गौतम जवंजाळ घेणार जलसमाधी ! घरकुल घोटाळ्यातील दोषींवर अद्यापही कारवाई नाही - जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. प्रशासन हादरले.

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-




वेगवेगळ्या व अनोख्या आंदोलनाने जिल्ह्यात नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ पुन्हा मैदानात उतरले आहे. मात्र यावेळील लढाई थेट आर की पारची च आहे. म्हणजेच घरकुल घोटाळ्यातील दोषींवर पुरावे देवुनसुध्दा कारवाई होत नसल्यामुळे २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीदिनी जिल्हाधिकाऱ्यांना जलसामाधीचा इशारा  दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे अख्ख प्रशासन हादरले आहे. व दोषींवर कारवाईच्या प्रक्रीयेला वेग मिळाला असल्याची माहिती मिळाली आहे.

         जळगाव सारखा घरकुल महाघोटाळा उघळकीस आणण्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गौतम जवंजाळ अनेक महिन्यांपासुन लढा देत आहे. चांदुर रेल्वे नगरपरीषद अनेक महिन्यांपासुन भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावर जिल्हाभर गाजत आहे. गरीब नागरीकांसाठी शासनाने घरकुल योजना काढली होती. मात्र चांदुर रेल्वे नगरपरीषदअंतर्गत अनेक गरीब नागरीक या योजनेपासुन वंचित राहीले असुन या घरकुलाचा लाभ शहरवासीयांच्या सेवेकरीता असलेलेच नगरपरीषदेचे नगरसेवक, नगर परिषदेचे कर्मच्यारी व ज्या लोकानां घरकुलाची आवश्यकता नसताना एकाच घरी दोन-दोन, तिन-तिन घरकुलाचा लाभ घेतला आहे. याशिवाय अनेक मागण्यांसाठी सच्चा सामाजिक कार्यकर्ते गौतम अण्णाजी जवंजाळ 24 जानेवारीपासुन आमरण उपोषणाला बसले होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी 29 जानेवारीला तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांना 5 सदस्यीय समीतीचे गठन करून 10 दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तहसिलदारांसह 5 सदस्यीय समीतीच्या अहवालात एकात्मीका गृहनिर्मान व झोपडपट्टी सुधार कार्यक्रमांतर्गत घरकुलाचा लाभ घेतलेला असतांना सुध्दा रमाई घरकुल याजनेचा लाभ घेतलेल्या 23 शहरवासीयांची नावे समाविष्ट आहे. हा अहवाल 24 फेब्रुवारीचा आहे. मात्र अहवालानंतरही दोषींवर कारवाई होत नसल्यामुळे गौतम जवंजाळ यांनी विहिर कोठडीत 25 एप्रीलपासुन तब्बल रीकॉर्ड ब्रेक 96 तासांच्यावर उपोषण केले. त्यांच्या या उपोषणानंतर तत्कालीन मुख्याधिकारी गिता ठाकरे यांनी काम नसतांना सुध्दा पुन्हा चौकशी करीत नवीन अहवाल सादर केला. वरीष्ठांचा अहवाल अमान्य करून नवीन अहवालात 10 नावे गायब करून फक्त 13  नावांचा समावेश आहे. हा नवीन अहवाल सामाजिक न्याय व सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना पाठविण्यात आला होता व नमुद 13 लाभार्थ्यांनी खोटे दस्ताऐवज सादर करून शासनाची फसवणुक केल्याच्या अनुषंगाने फौजदारी गुन्हे दाखल करावे किंवा याबाबत मार्गदर्शन करावे असे नमुद केले होते. मात्र या प्रकरणात सामाजिक न्याय विभागाने हात वर केले होते व दोषींवर कारवाईची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची असल्याचे सांगितले. मात्र ही कारवाई प्रक्रीया मुख्याधिकारी ठाकरे यांच्या कार्यकाळात थंडबस्त्यात होती. आता यांची बदली झाल्यानंतर नवीन मुख्याधिकारी अलोने दोषींवर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना आता गौतम जवंजाळ यांनी चक्क जलसमाधीचा इशारा दिला आहे. संपुर्ण देशात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात येते. व या दिवशी गौतम जवंजाळ त्यांच्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रांती चौक येथील विहीरीत जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले तसेच निवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रविण पोटे, चांदुर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांना दिल्या आहे. त्यांच्या या इशाऱ्यामुळे अख्ख प्रशासन हादरल्याचे समजते. याबाबत तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दोषींवर कारवाई प्रक्रीयेला वेग मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे घरकुल घोटाळ्यातील दोषींवर २ ऑक्टोंबरपुर्वी कारवाई होणार की गौतम जवंजाळ जलसमाधी घेणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे..



प्रशासनाविरोधात कोर्टात जायला पैसे नसल्यामुळे जलसमाधी- श्री जवंजाळ

घरकुल घोटाळ्यातील दोषींवर कारवाईसाठी मी दोन वेळा उपोषण, आंदोलने केली. याबाबत पुरावे दिले, मुख्यमंत्र्यांचे पत्र आले, जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आले, अहवाल तयार झाला यावरून भ्रष्टाचार असल्याचे सिध्द झाले. मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही. मतांच्या राजकारणासाठी आपआपल्या कार्यकर्त्यांना चार- चार घरकुले देण्यात आली. यावर उपोषणाने मार्ग निघाला नाही केवळ आश्वासने मिळाली. प्रशासनाविरोधात कोर्टात जायला पैसे नसल्यामुळे मी या भ्रष्टाचाराविरोधात येत्या २ ऑक्टोंबर रोजी जलसमाधी घेणार आहो

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.