पाकिस्तानशी चर्चा पुष्कळ झाल्या, आता युद्धाविना पर्याय नाही !
अप्पर जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना धर्माभिमानी |
नंदुरबार - पाकिस्तानशी चर्चा पुष्कळ झाल्या असून आता
युद्धाविना पर्याय नाही. आवश्यकता पडल्यास आम्ही आमची मुलेही
राष्ट्ररक्षणासाठी युद्ध भूमीवर पाठवायला सिद्ध आहोत. सरकारने ठोस पावले
उचलली नाहीत, तर आम्ही काश्मीरमध्ये जाऊन पाकिस्तानधार्जिण्या
आतंकवाद्यांना धडा शिकवल्याविना रहाणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया
हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात आल्या. उरी येथे आतंकवाद्यांनी केलेल्या
आक्रमणाच्या निषेधार्थ आणि हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण
करण्यासाठी २० सप्टेंबर या दिवशी येथील सुभाष चौकात हिंदु जनजागृती
समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ज्येष्ठ स्वयंसेवक भिका गिरनार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे
दिलीप ढाकणे पाटील, राणा राजपूत समितीचे मोहितसिंग राजपूत, ब्राह्मण
महासंघाचे दिनेश पाठक, सिंदगव्हाणचे ग्रामस्थ विठ्ठल पाटील, मंगलसर आणि
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील उपस्थित होते. उपस्थित सर्व
राष्ट्रप्रेमींनी सैनिकांचा जयजयकार करत पाकिस्तानविरोधी आणि आक्रमणाच्या
निषेधार्थ घोषणा दिल्या. अमर जवान स्तंभाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून
श्रद्धांजली अर्पण केली. सर्वश्री नरेंद्र तांबोळी, चेतन राजपूत, दीपक
गवळी, सागर वंजारी, मुकेश राजपूत आदी धर्माभिमानी आणि समितीचे कार्यकर्ते
हेही या वेळी उपस्थित होते. हिंदुत्वनिष्ठांनी केंद्रीय गृहमंत्री
राजनाथसिंह यांना उद्देशून अप्पर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन
दिले. यात मागील १० वर्षांपासून भारतीय सैनिक हुतात्मा होत असून आता थेट
युद्ध करून काश्मीरला आतंकवादमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली.
Post a Comment