चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-

चांदुर रेल्वे नगरपरीषदमधील वादग्रस्त मुख्याधिकारी ठाकरे यांची गेल्या सतरा दिवसांपुर्वी बदली झाली होती मात्र तेव्हापासुन मुख्याधिकारी नसल्यामुळे शहरातील कामे खोळंबली होती. यामुळे शिक्षण, आरोग्य सभापती नितीन गवळी आक्रमक झाले होते व तत्काळ नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांना दिलेल्या निवेदनातुन केली होती. याचीच दखल घेऊन अखेर चांदुर रेल्वे नगरपरीषदचा प्रभार चिखलदार नगरपरीषदचे मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्याकडे शुक्रवारी सोपविण्यात आला आहे.
वादग्रस्त मुख्याधिकारी गिता ठाकरे यांच्या शहरातील जवळपास सहा महिन्यांच्या कार्यकाळात चांदुर रेल्वे नगर परीषद जिल्हाभर गाजली होती. त्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरवासी त्रस्त झाले होते. अखेर या वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांची सतरा दिवसांपुर्वी बदली झाली होती. अशा वादग्रस्त मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीनंतर तत्काळ नवीन मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. शासनाच्या १ सप्टेंबर २०१६ च्या परीपत्रकाप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांचे पद रीक्त ठेवता येत नाही. तसेच रीक्त पद तत्काळ नायब तहसिलदाराांपेक्षा कमी नाही अशा अन्य महसुली अधिकाऱ्यांकडे किंवा नजिकच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपविणे गरजेचे आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या रीक्त पदामुळे शहरातील शौचालयाचे धनादेश, फेरफार नोंदणी, विहीरीत ब्लिचींग पावडर टाकणे, जन्म मृत्यु दाखला, मच्छर फवारणी तसेच इतर सुरू असलेली कामे पुर्णत: ठप्प पडली होती. निर्माण झालेल्या या समस्यांमुळे सगळ्यात सक्रीय असणारे शिक्षण, आरोग्य सभापती आक्रमक झाले होते. व निर्माण झालेल्या समस्या लक्षात आणुन देण्यासाठी, तत्काळ रीक्त असलेले मुख्याधिकारी पद भरण्यासाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांची बुधवारी भेट घेतली होती व याबाबतचे निवेदन देवुन मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी केली असता शहरातील वाढत्या समस्या पाहता मुख्याधिकारी यांनीही तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. व अखेर शुक्रवारी प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोने रूजू झाले आहे. चिखलदरा येथे सद्या कोणतीही निवडणुक नाही आहे. अलोने चिखलदऱ्याचे मुख्याधिकारी असुन डिसेंबरमध्ये चांदुर रेल्वे नगर परीषदच्या होणाऱ्या निवडणुकीमुळे त्यांना प्रभार देण्यात आल्याचे समजते. ते सोमवार, बुधवार व शुक्रवारी हे तीन दिवस चांदुर रेल्वे नगर परीषदचा काम पाहणार असुन उर्वरीत तीन दिवस चिखलदरा नप येथे राहणार आहे..
घरकुल घोटाळ्यातील दोषींवर करणार का कारवाई ?
चांदुर रेल्वे नगरपरीषदेमधील जिल्हाभर गाजलेला मोठा घरकुल घोटाळा उघडकीस आल्यानंतरही अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. वादग्रस्त मुख्याधिकारी ठाकरेंची या प्रकरणातील भुमीका संशयास्पद होती. समाज कल्याण विभागाने या प्रकरणात आपले हात वर केले असुन दोषींवर कारवाईची जबाबदारी स्थानिक मुख्याधिकाऱ्यांची असल्याचे सांगितले. त्यामुळे नवीन मुख्याधिकारी अलोने यांच्याकडुन तडकाफडकीचे निर्णय घेवुन दोषींवर कारवाई होणार का व तक्रारकर्ते गौतम जवंजाळ यांना न्याय मिळणार का ? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे व शहरवासीयांनाही मुख्याधिकारी अलोने यांच्याकडुन खुप काही अपेक्षा असल्याचे समजते.

Post a Comment