गजानन काळुसे /--
सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ या खेड्यातील युवक रामेश्वर महाजन या कृषी पदवी धारक युवकाने आपल्या गावमध्ये एक उत्कृष्ट प्रकारचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे .शेतकऱ्याची होणारी पिळवणूक थांबण्यासाठी तसेच सतत पडणारा दुष्काळ व नापिकी यावर मात करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांची सर्व बी बियाणे औषधी व खते याची एकत्रित मागणी घेऊन या सर्व निर्विष्ट जागेवर व योग्य वेळेत उपलब्ध करून दिल्या जात. या अगोदर शेतकऱ्यांना 20 कि.मी. वरून मालाची खरेदी करावी लागत असे. जागेवर माल उपलब्ध झाल्याने गाडी भाड्याची बचत झाली. या सोबतच मागणी नुसार माती परीक्षण सुविधा पुरवली . reliance foundation यांच्या मार्फत पीक व्यवस्थापन,हवामान,शासकीय योजना यांची माहिती sms स्वरूपात शेतकऱयांना पुरवीत आहे. ग्रामीण भागात नवीन संकरित वाणाची जाणीव व्हावी यासाठी कृषी विषयक पुस्तक साठा अगदी मोफत सुरु केला
विशेष म्हणजे प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून योग्य प्रकारे मार्गदर्शन करतात.
यांनी गावातील युवा शेतकऱयांचा कृषी विभाग आत्मा अंतर्गत एक गट केला असून या गटामार्फत शेंद्रीय शेती यावर भर देत आहेत.
रामेश्वर महाजन यांनी कृषी मंत्रालय नाबार्ड (MANAGE)अंतर्गत कृषी उद्योजकता विकास प्रशिक्षण घेतले असुन विविध शासकीय व खाजगी प्रकल्पामध्ये काम केले आहे.त्यामुळे त्यांचा अनुभवाचा फायदा गावातील शेतकऱ्यांना व्हावा हा त्यांचा मानस आहे. असे त्यांनी बोलताना सांगितले.

Post a Comment