रंगय्या रेपाकवार/-- अहेरी/--
सेंद्रिय खत आधुनिक शेती साठी वरदान असून ज्यामुळे जमिनीतील नैसर्गिक तत्वे टिकून राहतात सेंद्रिय खतापासून आपल्या शेतातील उत्पादकता एकदम कमी खर्चात वाढवता येते ज्यामुळे सोडियम च प्रमाण कमी होऊन उत्पन्न वाढते व पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून किडचा नाश होतो असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे उदघाटक उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे ह्यांनी केले
अनुलोम ट्रस्ट द्वारे पर्यावरण मित्र गट च्या पुढाकाराने युवाशक्ती गणेश मंडळ मध्ये आयोजित निर्माल्य कुंड च्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अहेरीचे नगराध्यक्षा प्राजक्ता पेदपल्लीवार, तसेच पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष विवेक बेझलवार युवाशक्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष विकास उईके व पर्यावरण मित्र गटाचे गटनायक रवी जोरीगलवार मंचावर उपस्थित होते
पर्यावरण मित्र गट अहेरीतील प्रत्येक गणेश मंडळात निर्माल्य कुंड देऊन त्या निर्माल्याचे सेंद्रिय खतात रूपांतर करून शेतकऱ्यांना देणार आहे व एक आदर्श लोकांसमोर ठेवण्याची इच्छा गटाची असल्याचं सांगण्यात आले
अहेरीत रोज वापरण्यात येऊन फेकल्या जाणाऱ्या कित्येक वस्तू पण सेंद्रिय खत व इतर कामासाठी येऊ शकतात म्हणून अश्या सर्व उपयोगी वस्तू चे योग्य नियोजन नगरातील प्रत्येक घरात करण्यात यावे असे आवाहन नगराध्यक्षा प्राजक्ता पेदपल्लीवार ह्यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन अनुलोम चे तालुका जनसेवक पंकज नौनुरवार तर आभार गटप्रमुख रवी जोरीगलवार ह्यांनी मानले कार्यक्रमात शेतकरी वर्ग परिसरात जनता व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते

Post a Comment