गजानन काळुसे /
सिंदखेड राजा
सिंदखेड राजा
----
खरीपांच्या पेरणी नंतर पावसाने चांगली सुरुवात केल्या नंतर पिकाची स्थिती मजबुत अवस्थेत होती. परंतु मध्य तरी एक महीना पावसाने उघडिप दिली, असल्याने खरीपा च्या पेरणी तील पिके धोक्यात आली. पिके वाळु तसेच सुकु लागली होती, खरीपाची पेरणी धोक्यात येते की काय? अशी भीती व्यक्त होत असताना. पावसाने दमदार सुरुवात केली दोन तीन दिवसापासून अधुन मधून सर्वत्र पावसा च्या सरी कोसळत आहेत. या पावसाचा फायदा खरीपातिल पिकांना मिळणार असल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेली सतत दोन ते तीन वर्ष पाऊस कमी पडल्या मुळे आथिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीपा च्या पेरणी साठी ची तयारी करण्यासाठी अनंत अडचणी चा सामना करावा लागला. आथिक तडजोड आणि त्यानंतर पिक व्यवस्थापना साठीचा खर्च याचा ताळमेळ बसविण्यासाठीचा शेतक-यांना चांगलीच कसरत करावी लागली. या वर्षाचा पाऊस चांगला झाल्यामुळे या वर्षीचा हंगाम गेल्या अनेक वर्षाच्या तुटीचा खर्च भरुन काढेल अशी आशा शेतक-यांना होती ,परंतु दुदैवाने सुरुवातीला पडलेला पाऊस मध्यतंरी खंड देऊन गेला मध्यतरी पावसाने उघडीपी दिली, असल्याने शेतक-यांच्या आशेवर पाणी फेरले गेले होते.
खरीपा च्या सुरुवातिचे पिक मुग, उडद, व नगदी पिके, सोयबीन शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना मिळालेली अखंड पणाची उघडिप शेतकयांना कायम चिंतीत करणारी ठरली आगामी काळात उत्पादनाच्या प्रमुख पिक कपाशीच्या पिकाला पावसाची साथ संगत मिळने अपेक्षित आहे .ही पिके वगळता उत्पादनाच्या प्रमुख पिक कपाशीला या पावसाचा निश्चिचत फायदा होणार आहे,परंतु आणखी ही काही दिवस मौसमी पावसाची साथ संगत अपेक्षित आहे.तरच खरिपाचा हंगाम शेतक-यांच्या पदरात पडेल, यात तिळमात्र शंका नाही.

Post a Comment