काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात
आणखी एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट
उसळली असून, आतापर्यंत 18 जवान शहीद झाले आहेत.
विकास जनार्दन कुळमेथे असे शहीद जवानाचे नाव असून, ते यवतमाळचे रहिवाशी होते. रविवारी झालेल्या या हल्ल्यात विकास हे जखमी झाले होते. त्यानंतर उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान विकास यांचा आज मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण 4 जवान शहीद झाले होते. लान्स नायक चंद्रकात शंकर गलांडे, शिपाई पंजाब जानराव उईके, शिपाई संदीप सोमनाथ ठोक आणि शिपाई विकास जनार्दन अशी वीर मरण आलेल्या जवानांची नावे आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 15 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.

Post a Comment