पत्रकार परिषदेला संबोधित करतांना डावीकडून श्री. गुरुप्रसाद, श्री. गंगाधर कुलकर्णी आणि श्री. व्यंकटरमण नायक |
हुबळ्ळी (कर्नाटक) - दाभोलकर कुटुंबियांनी अंधश्रद्धा
निर्मूलन समिती या ट्रस्टचे आर्थिक ताळेबंदही योग्य कालावधीत धर्मादाय
आयुक्तांना सादर केलेले नाहीत. त्यामुळे आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणी
दाभोलकर कुटुंबियांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी श्रीराम सेनेचे कर्नाटक
राज्य संघटक श्री. गंगाधर कुलकर्णी यांनी केली. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी
२४ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला श्रीराम
सेनेचे कर्नाटक राज्य संघटक श्री. गंगाधर कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे
राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद आणि श्री. व्यंकटरमण नायक यांनी संबोधित
केले.
सनातनच्या साधकांवर पूर्वग्रह ठेवून कारवाई करू नये !
- श्री. गुरुप्रसाद, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
सनातनच्या साधकांचे अन्वेषण होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
आतापर्यंत कर्नाटक पोलिसांनी उत्तम पद्धतीने कलबुर्गी प्रकरणाचे अन्वेषण
केले आहे. पुरोगाम्यांच्या हत्या करणारे सापडले नाहीत; म्हणून
महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात पोलिसांनी कोणत्याही कारणाने पूर्वग्रह ठेवून
सनातनच्या साधकांवर अथवा इतर कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या
कार्यकर्त्यांवर कारवाई करू नये
Post a Comment