गडचिरोली/ रंगय्या रेपाकवार /--
भारतातुन कुष्ठरोग हद्वपार करण्याचे उदिष्ट पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी निश्चित केले आहे. या उद्दिष्टाच्या पुर्ततेसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाचा आढावा केंद्रीय मंत्री जे.पी.नडा यांनी नुकताच घेतला. त्यानुसार प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे आदेशान्वये सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) गडचिरोली, जिल्हा आरोग्य आधिकारी जि.प.गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 19 संप्टेबर 2016 ते 4 ऑक्टोबर 2016 पर्यत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असून या मोहिम मध्ये नागरिकांची तपासनी करण्यात येणार आहे. या मोहिमेला जिल्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी तपासनी करुन घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी केले.
या माहिमेसाठी प्रशिक्षीत आशा स्वयंसेविका,कुष्ठरोग स्वयंसेवक, आरोग्य सेवक इत्यादीचा सहभाग असलेल्या तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये एक पुरुष व एक स्त्री कार्यकर्त्याचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांना विभाग, गावावर क्षेत्रांची विभागणी करुन दिली असुन प्रत्येक पथक दररोज 20 ते 25 घरी जावुन कुटुंबातील सदस्यांची तपासणी करणार आहेत. या सोबतच संपुर्ण गडचिरोली जिल्हयामध्ये त्वचा रोग व कुष्ठरोग शोध अभियान विषयी जनजागृती करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये शेाधलेल्या सशंयीताची तपासणी मोहिमेचे पर्यवेक्षण करणारे पर्यवेक्षक तसेच वैद्यकिय अधिकारी हे करणार असून निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांना त्वरीत उपचार देण्यात येणार आहे.

Post a Comment