चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
पाकीस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्करी मुख्यालयावर रविवारी पहाटे भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले. शहीदांना शहरातील तिसऱ्या आघाडीच्यावतीने मंगळवारी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच या हल्ल्याच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पाकीस्तान ध्वजही जाळण्यात आला.
उत्तर काश्मीरमधील उरी शहरात रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांसह घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी एका बटालियन मुख्यालयावर हल्ला केला. यामध्ये 17 जवान हुतात्मा झाले आणि अन्य 19 जण जखमी झाले. दरम्यान, चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. यामधील शहीद जवानांना शहरातील तिसऱ्या आघाडीतर्फे मंगळवारी श्रध्दांजली वाहण्यात आली तसेच स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पाकीस्तानचा ध्वज जाळुन या घटनेचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला. शहीद जवानांमध्ये शहरापासुन जवळच असलेल्या नांदगाव खंडेश्वर येथील विकास उईके यांचा सुध्दा समावेश आहे. यावेळी विकास उईके अमर रहे अमर रहे असे नारे सुध्दा देण्यात आले.
यावेळी जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले, तिसऱ्या आघाडीचे अध्यक्ष सुमेरचंद जैन, आम आदमी पार्टीचे विदर्भ कार्यकारीणी सदस्य नितीन गवळी, कॉ. प्रा. विजय रोडगे, शिवसेना शहरप्रमुख गजानन यादव, विनोद लहाने, अंबादास हरणे, कॉ. सचिन ढोणे, देविदास मेश्राम, एकनाथ भटकर, खुशाल चव्हाण, बंदिश अंबापुरे, वाहने वाईंडर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थीत होते.

Post a Comment