सांगली येथील मराठा समाजाच्या मोर्च्यास श्रीशिवप्रतिष्ठानचा पाठिंबा !
सांगली - जो मराठा समाज आज जातीच्या
आधारावर आरक्षण मागत आहे, तोच समाज भविष्यात गुणवत्तेवर आरक्षण मागेल, अशी
स्थिती येईल, असे उद्गार श्रीशिवप्रतिष्ठानचे पू. भिडे गुरुजी यांनी काढले.
सांगली येथे २७ सप्टेंबर या दिवशी होणार्या मराठा समाजाच्या मोर्च्यास
श्रीशिवप्रतिष्ठानने पाठिंबा घोषित केला. त्या वेळी ते उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, रांझे पाटील याला शिक्षा करून बलात्कार
करणार्यांना कशा प्रकारे शासन करावे, याचा आदर्श छत्रपती शिवाजी
महाराजांनी घालून दिला आहे. अशाच प्रकारे महिलेशी गैरवर्तवणूक करणार्या
स्वत:च्या नातेवाइकासही छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा केली होती.
Post a Comment