BREAKING NEWS

Sunday, September 25, 2016

पुण्यात मराठा मूक मोर्चा ची सांगता - जिजाउंचा लेकीनी दिले जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन

जिजाउंचा लेकी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना
पुणे :- पुण्यात आज  आयोजित केलेल्या क्रांती मराठा मूक मोर्चाची दुपारी एक वाजता राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. सकाळी साडेदहा वाजता डेक्कन येथील तरुणींच्या हस्ते संभाजी पुतळ्याला पुष्पहार घालून मराठा मूक मोर्चास प्रारंभ झाला. त्यानंतर हळू-हळू  मार्गक्रमण करत दुपारी साडे बाराच्या सुमारास विधान भवनात पोहोचला असून तरुणींच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री सौरभ राव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर एक वाजता राष्ट्रगीताने सागंता करण्यात आली. 

 
राज्यातील विविध जिल्ह्यात मराठा समाजाच्या आरक्षणासह, कोपर्डी अत्याचार व अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा या मागण्यासाठी या मूक मोर्च्यांचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातील मोर्चात यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवारसह सहभागी झाले. तसेच राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, भाई जगताप, विश्वजीत कदम, उदयन राजे भोसले धावपटू ललिता बाबर हे सहभागी झाले. मोर्चात तरुणांसह अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला. यावेळी डेक्कनमध्ये यावेळी अभूतपूर्व जनसागर एकत्रित झाला होता. भगवे झेंडे, आणि भगव्या टोप्या यामुळे भगवा जनसागर उसळल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 
सदर मोर्च्याचा
नियोजनासाठी 2 हजार खाजगी सुरक्षा रक्षक, 5 ड्रोन कॅमेरा, 10 हजार स्वंयसेवक 14 हजार पोलीस, 2 हजार होमगार्ड, 2 हजार डॉक्टर व 80 रुग्णवाहिका या मोर्च्यासाठी कार्यरत होत्या. यावेळी एवढ्या गर्दीतही महिलांना व रुग्णवाहिकांना रस्ता करून देत शिस्तीचे व सौजन्याचे प्रदर्शन मराठा तरुणांकडून दाखविण्यात आले. 

माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुकमोर्चा असल्यामुळे मी कोणतेही मत व्यक्त केले नाही. तर मार्चा प्रारंभ होण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी, हा मोर्चा मराठा समाजाच्या हक्कासाठी आहे. मोर्चातील सर्व मागण्या रास्त आहेत. मागण्या मान्य करणे ही प्रत्येक आमदार आणि खासदार यांची जबाबदारी आहे. अद्यापपर्यंत कोपर्डी घटनेतील आरोपीची एफआयआर दाखल होत नाही, ही शोकांतिका आहे. अशा आरोपींना गोळया घातल्या पाहिजे तसेच हे मोर्चे कोपर्डी घटना मराठा आरक्षण ते शेवटच्या घटकाकरिता मोर्चे आहेत, असे मत व्यक्त केले. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.