सातारा - शहरातील घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पारंपरिक
पद्धतीने मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव आदी ठिकाणी होते. हे तलाव
सावर्र्जनिक असल्याने आणि शेकडो वर्षे या तलावांत गणेशमूर्ती विसर्जन होत
असल्याने याला कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही; परंतु काही हिंदु धर्मद्रोही
संघटनांनी प्रदूषणाच्या गोंडस नावाखाली सातारा नगरपालिकेची दिशाभूल करून
हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या पवित्र उत्सवात अडथळा निर्माण करण्याचा
प्रयत्न मागील वर्षी केला. यामुळे या तळ्यांमध्ये सार्वजनिक गणेशमूर्तींचे
विसर्जन तर झालेच नाही शिवाय घरगुती गणेशमूर्तीही गणेशभक्तांना नाईलाजाने
'दान' म्हणून द्याव्या लागल्या. तरी पोलीस आणि प्रशासनाने हिंदूंच्या
धर्मभावना दुखावणारी धर्मशास्त्रविसंगत 'मूर्तीदान' मोहीम राबवणार्यांवर
कडक कारवाई करावी. तसेच शहरातील सार्वजनिक तळी गणेशमूर्ती विसर्जनासाठी
खुली करून द्यावीत, अशी एकमुखी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने
शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आली.
येथील पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषद पार पडली. या वेळी
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक, श्री. हेमंत सोनवणे, विश्व
हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, श्रीशिवप्रतिष्ठान
हिंदुस्थानचे श्री. सुधन्वा गोंधळेकर आणि सनातन प्रभातचे वार्ताहर श्री.
राहुल कोल्हापुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी श्री. हेमंत सोनवणे म्हणाले की, जिल्हाधिकार्यांच्या
सांगण्यावरून सातारा नगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाचा गैरवापर
करत शहरातील तळ्यांवर मूर्ती विसर्जनास मनाई असल्याचे बेकायदेशीर फलक
झळकवले होते. शहरातील स्वयंघोषित समाजसेवकाने मुंबई उच्च न्यायालयात
प्रविष्ट केलेली याचिका निकालात काढतांना मूर्ती विसर्जनास मनाई असल्याचे
कोणतेही आदेश दिलेले नाहीत. यामुळे शहरातील धार्मिक परंपरांमध्ये
प्रशासनाने हस्तक्षेप न करता तटस्थ भूमिका घ्यावी. तसेच पारंपरिक
गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील तळी खुली करून द्यावीत, अशी मागणी आम्ही
करत आहोत.
या वेळी श्री. वाडेकर म्हणाले की, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वयंघोषित
समाजसेवक आणि नास्तिकतावादी या मूर्ती 'दान' म्हणून घेण्यासाठी शालेय आणि
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर करत आहेत. याला स्वयंघोषित समाजसेवक,
त्यांच्या धर्मद्रोही संघटना तसेच पोलीस आणि प्रशासनही तितकेच उत्तरदायी
आहेत. याच गणेशमूर्ती पुढे नगरपालिकेच्या कचर्याच्या गाड्यांतून
शहराबाहेरील पाण्याची डबकी, पडीक असलेल्या खाणी यांमध्ये डंपिंग करून
निर्गमित करण्यात येतात.
या वेळी श्री. राहुल कोल्हापुरे म्हणाले की, पुणे येथील 'सृष्टी इको
रिसर्च सेंटर' या संस्थेने असा दाखला दिला आहे की, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या
मूर्तीविसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होत नाही. मुख्याधिकार्यांनी
'कृत्रिम तलावांचा खर्च पालिकेला परवडण्याजोगा नसल्याने तळी गणेशमूर्ती
विसर्जनासाठी खुली करून द्यावी', असा ठराव केला होता. पारंपरिक
मूर्तीविसर्जन बंद करण्यास शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि गणेशभक्त
यांचा तीव्र विरोध आहे.
समितीच्या या भूमिकेला शहरातील वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय,
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु
महासभा, सनातन संस्था आदी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांनी भक्कम
पाठिंबा दर्शवला आहे.
Post a Comment