कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिरात महाद्वार प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस अजित होडगे याने मद्यधुंद अवस्थेत एका महिला भाविकाशी अरेरावी करून उद्धट वर्तन केले. या प्रकारामुळे भाविकांत संतापाची लाट उसळली. तणाव निर्माण झाल्याने होडगे याला जुना राजवाडा पोलिसांनी रात्री कह्यात घेतले. संबंधित पोलिसाने पर्समधील एक सहस्र रुपये परस्पर काढून घेतल्याचाही आरोप महिलेने माध्यमांशी बोलतांना केला; मात्र पर्समधून रक्कम काढून घेतल्याच्या तक्रारीत तथ्य दिसून येत नाही, असे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगून मद्यधुंद पोलिसाची बाजू घेतली.
या पोलिसाने पर्स घेऊन मंदिरात जाता येणार नाही, असे बजावत हातातील पर्स आणि अन्य साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या घंट्यानंतर पर्स परत घेतांना त्यातील पैसे चोरल्याचे लक्षात आले.
या पोलिसाने पर्स घेऊन मंदिरात जाता येणार नाही, असे बजावत हातातील पर्स आणि अन्य साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न केला. अर्ध्या घंट्यानंतर पर्स परत घेतांना त्यातील पैसे चोरल्याचे लक्षात आले.
Post a Comment