ठाणे - येथील साईबाबा सत्संग केंद्र रसायनी यांच्याकडून २४
ऑगस्टला श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने भजन आणि प्रवचन यांचे आयोजन
करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्था ठाणे या न्यासाच्या वतीने सौ.
पुष्पा चौगुले यांनी श्रीकृष्णजन्माष्टमीचा इतिहास आणि उत्सव कसा साजरा
करावा, याचे महत्त्व सांगितले. तसेच गोपाळकाला आणि दहीहंडी यांचे महत्त्व
आणि हे उत्सव साजरे करतांना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी
सांगितले. यांसह महिलांवरील होणार्या वाढत्या अत्याचारांच्या
पार्श्वभूमीवर स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अनिवार्यता विशद केली. या
मार्गदर्शनाचा ५० जिज्ञासूंनी लाभ घेतला. श्रीकृष्णाच्या श्लोकाने या
कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. सनातन संस्थेच्या सौ. जयश्री म्हैसकर यांनी
श्रीकृष्णाचा पाळणा आणि आरती म्हटली. कार्यक्रमानंतर सौ. पुष्पा चौगुले
आणि सौ. जयश्री म्हैसकर यांचा साईबाबा सत्संग केंद्राकडून सत्कार करण्यात
आला. तसेच यापुढेही अशा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
Post a Comment