पुणे- येथील
समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी श्रीकृष्ण उत्तमराव खोकले याने
कासेवाडी परिसरातील एका ५५ वर्षांच्या महिलेला किरकोळ कारणावरून ३० ऑगस्ट
या दिवशी रात्री लाकडाने पुष्कळ मारहाण केली. हे प्रकरण आपापसात मिटवल्याने
गुन्हा प्रविष्ट करण्यात आला नाही. खोकले याने केलेल्या मारहाणीत ती महिला
गंभीर घायाळ झाली असून तिच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू
आहेत.
खोकले हे कासेवाडी परिसरातील एका किराणा
दुकानात गेले होते. त्या वेळी ती महिलाही तेथेच होती. त्या महिलेला मद्याचा
वास आल्याने तिने त्याविषयी विचारणा केली.
त्यावरून दोघांत वाद झाला आणि खोकले यांनी तिला मारहाण केली. त्यानंतर
खोकले याच्यावर गुन्हा प्रविष्ट केला जावा, अशी मागणी त्या महिलेच्या
नातेवाइकांनी केली; परंतु हे प्रकरण मिटवण्यात आले. समर्थ पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले की, हा प्रकार
गैरसमजुतीतून घडला. त्या महिलेने तक्रार प्रविष्ट करत नसल्याचे लिहून
दिल्याने गुन्हा प्रविष्ट केलेला नाही.
Post a Comment